Share

कतरिनाच्या हातावर रंगणार लाखोंची खास मेहंदी!

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) आणि विकी कौशल ( Vicky Kaushal) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या जोडप्याच्या लग्नाबाबत जवळपास सर्वच प्रकारची माहिती समोर आली होती, मात्र आता समोर आलेले अपडेट जाणून सर्वानाच धक्का बसेल. कतरिना कैफने लग्नासाठी राजस्थानची प्रसिद्ध मेहंदी (special mehndi ) ऑर्डर केली आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये सांगितली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,लग्नाच्या वेळी कतरिना कैफच्या हातावर लागणारी मेहंदी खूप खास असेल. ही मेहंदी कतरिना कैफने पाली (राजस्थान) येथून मागवली आहे. राजस्थानच्या सोजत जिल्ह्यातील मेहंदीला हेना म्हणून ओळखले जाते आणि त्याची चमक खूप खास आहे. ही मेहंदी तिच्या खास वैशिष्ट्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. कतरिना कैफसाठी सोजतचे कारागीर स्वतःच्या हातांनी मेहंदी तयार करत आहेत. त्यात कोणतेही रसायन असणार नाही. कतरिनाला मेहंदीचा नमुना पाठवण्यात आला होता, जो तिने पास केला आहे. या मेहंदीची किंमत ५० हजार ते १ लाख रुपये इतकी आहे. मात्र, या बातमीबाबत विकी आणि कतरिनाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र व्यापारी तिच्याकडून एकही रुपया घेणार नाही, असे वृत्त रिपोर्ट्सने दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम याची चाचपणी सध्या करत आहे, असे म्हटले जात आहे. दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

कतरिना कैफच्या पहा ग्लॅमरस अदा.

 

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!