तुळजापूर : कोरोना पार्श्वभूमीवर शाषणाने ऐक वीस दिवस लॉकडाऊन जाहीर केल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या दोनशे परप्रांतीय कामगारांना उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. हाताला काम नाही, जेवायला अन्न नाही, गावी जायाला वाहने नाहीत, जगायाचे कसे असा प्रश्न या कामगारांसमोर निर्माण झाला आहे.
या परप्रातीय कामगारांंचा रोटीचा प्रश्न मिटविण्यासाठी त्यांना काम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी भुकेने व्याकुळ झालेले कामगार करीत आहेत. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सर्वञ मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने बांधकाम क्षेत्रात मजूर टंचाई निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर बांधकाम करणाऱ्या मंडळी नी यावरमात करण्यासाठी परराज्यातील मजूर येथे आणले हे मजूर प्रामाणिकपणे व दर्जदार काम करीत असल्याने त्यांना मागणी वाढली माञ अचानक कोरोना पार्श्वभूमीवर 21दिवसाचे लाँकडाऊन शाषणाने जाहीर केल्याने या कामगारांना काम मिळणे बंद झाले आहे.
गावी जावे म्हटलं तर वाहने बंद असल्याने ही मंडळी भुकेने व्याकुळ झाली आहेत रहायला घर नाही हाताला काम नाही जेवायला अन्न नाही अशी परिस्थिती यांची निर्माण झाल्यानै अन्नासाठी ही मंडळी लाचार बनली आहेत. माणुसकीच्या नात्याने सरकारने या मंडळीना नियमाप्रमाणे कामास परवानगी देवुन त्यांचा भुकेचा प्रश्न सोडवावा अन्यथा त्यांना शिधापाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

