Share

विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे लोटला भिमसागर

Published On: 

🕒 1 min read

कोरेगाव भीमा – भीमानदीकाठावरील कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून मंगळवारी (1 जानेवारी) लाखो आंबेडकरी बांधव आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात असून, नक्षल प्रभावित भागातील गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले आहेत. केंद्र-राज्य स्तरावरील सुमारे दोनशे वरिष्ठ अधिकारी मंगळवारच्या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून असणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या