Share

फाशी नको जन्मठेप द्या;कोपर्डी प्रकरणातील मुख्य दोषी आरोपीची मागणी

Published On: 

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. त्याचबरोबर शिंदेचे वकील मोहन मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.

राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. दोषींना शिक्षेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला. दोषीच्या वकिलांनी आज आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली.दुसरीकडे या प्रकरणातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केला. तसंच नितीन भैलुमे हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. तो दलित कुटुंबातील आहे. तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून, त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. शिवाय त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमात जास्त शिक्षेची तरतूद नाही. तो केवळ 102 ब कटकारस्थान आणि 109 गुन्ह्याला उत्तेजित करणं या दोनच कलमात दोषी आढळला आहे. त्याच्याविरोधात कोणताही साक्षीदार नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी नाही, त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. तो एक सुशिक्षीत मुलगा आहे, असा दावा नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अहेर यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!