Share

कोकणवासीयांसाठी धक्कादायक बातमी, मरकज मधील सहभागी व्यक्तीला कोरोनाची लागण!

Published On: 

महाराष्ट्र देशा टीम : देशात पुर्णपणे लॉक डाऊन असून सुद्धा निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमाला हजारो लोकांनी हजेरी लावल्याने यंत्रणेविषयी शंका निर्माण झाली होती. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यापैकी शेकडो नागरिकांना हलगर्जी व नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाचे संक्रमनामुळे बाधा झाली आहे.

हे मरकज मधील कोरोनाबाधित रुग्ण देशाच्या अनेक राज्यात आढळून येत आहेत. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात देखील हा आकडा वाढत आहे. या ठिकाणी रत्नागिरीतील ७ जणांनी हजेरी लावल्याचे समजते. या पैकी १ जण आता कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट मधून समजते. या रत्नागिरीतील रुग्णावर जिल्हा शासकीय रुगलयात उपचार सुरु आहेत, हि माहिती एबीपी माझाच्या वृत्तानुसार मिळत आहे.

जिल्हा रूग्णालयात मरकजला गेलेले 5 जण क्वॉरन्टाईन करून ठेवण्यात आले आहेत. या 5 जणांपैकी एकाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तर, एक मुंबई आणि एकाला आग्रा या ठिकाणी क्वॉरन्टाईन करून ठेवण्यात आले आहे. मरकजला गेलेल्या एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधिताची संख्या ही पुन्हा एकवर आली आहे.

कोरोनाबाधित आलेला व्यक्ति हा रत्नागिरीतील राजीवडा येथे राहतो. 18 मार्च रोजी हा व्यक्ति मरकजहून रत्नागिरीमध्ये आला होता. तेव्हापासून तो अनेकांच्या संपर्कात आला आहे. या साऱ्यांची आता टेस्ट केली जाणार आहे. शिवाय, खबरदारीचा उपाय म्हणूव पुढील 15 दिवस 3 किलोमीटरपर्यत हा परिसर सील केला जाणर आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

दरम्यान, मरकजला जाऊन अलेल्यांपैकी क्वॉरन्टाईन केले लोक हे अश्लील चाळे करत असून सहकार्य करत नसल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे ६५० हुन अधिक कोरोना बाधित रुग्ण हे या कार्यक्रमाला अनधिकृतपणे गेल्याने देशातील कोरोना बधितांचा आकडा आता ३००० पार जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!