टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत एनडीआरएफ , नौदल, आणि आर्मीच्या पथकाकडून बचाव कार्य सुरु आहे. कोल्हापूर आणि सांगलीला आलेला पुर हा कर्नाटक सरकारच्या निष्काळजीपणामुळे आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागात आलेला पूर महाराष्ट्र सरकारच्या चुकीमुळे आला असल्याचा कांगावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे.
या जल आपत्तीमुळे दोन्ही राज्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. आलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने आवश्यक तेवढे पाणी सोडले नसल्याने महाराष्ट्राच्या सांगली व कोल्हापूर भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगत, कर्नाटकने आलमट्टीतून पाच लाख क्युसेकने पाणी सोडावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे. तर कोयना धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे कर्नाटकच्या काही भागात पूर आला असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे.
गेले दोन दिवस राज्यात धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी धरण तुडुंब भरली आहेत. त्यामुळे प्रशासनाने धरणातले पाणी सोडले आहे. परिणामी याचा फटका अनेक गावांना बसला आहे. तर कोल्हापूर सांगलीतले जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर कर्नाटकात देखील बेळगाव, विजापूर, रायचूर, कलबुर्गी व यादगीर जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर बनत आहे.
‘मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द करून, पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याला भेट द्यावी’
दुध टंचाईची शक्यता, लाखो लिटर दुध टँकरमध्ये अडकले

