🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाची पिएचडी अवघ्या १४ महिन्यांमध्येच पुर्ण झाली. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे नील सोमय्या यांची पीएचडीची पदवी वादात आली आहे. अशातच फाईल्स आणि कागदपत्र दाखवून दीड डझन नेत्यांमागे चौकशीचा ससेमीरा लावणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या पदवीवर आता कारवाई होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई विद्यापीठाकडून अवघ्या १४ महिन्यात पदवी –
नील सोमय्यांनी ऑगस्ट महिन्यात प्रबंध सादर केला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. या तोंडी परीक्षेच्या दुसऱ्याचं दिवशी पीएचडी पदवी मुंबई विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली आहे. 17 सप्टेंबर 2016 ला नील सोमय्यांनी परीक्षा दिल्याचा दावा आहे. तर पीएचडी रजीस्ट्रेशनची तारीख जून 2021 ची आहे.
किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या नील सोमय्या यांच्या पिएचडी बाबत मुंबई विद्यापीठाकडं तक्रार –
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या नील सोमय्या यांच्या पिएचडी बाबत मुंबई विद्यापीठाकडं तक्रार करण्यात आली आहे. मात्र, सर्व काही नियमात केल्याचा दावा केला जात आहे. अशातच, विरोधकांनी सोमय्याच्या मुलाच्या पीएचडीच्या वेगावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. 14 महिन्यांचा आरोप खोडून काढत पीएचडीसाठी 72 महिने लागल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, सोशल मीडियावर दोन कागदपत्रे प्रचंड व्हायरल होत आहेत. यातील एका कागदपत्रानुसार 17 सप्टेंबर 2016 ला नील सोमय्यांनी परीक्षा दिल्याचा दावा आहे. तर पीएचडी रजीस्ट्रेशनची तारीख जून 2021 ची आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या हायस्पीड कारभराची चर्चा जोरदार रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | मला जर इतका संघर्ष करावा लागत असेल तर सर्वसामान्यांना किती संघर्ष असेल – एकनाथ खडसे
- Rutuja Latke | अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा अर्ज स्वीकारला, उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा
- Rutuja Latke | “आज जर रमेश लटके साहेब सोबत असते, तर…”, निवडणुक अर्ज भरण्यापूर्वी ऋतुजा लटके झाल्या भावूक
- Chhagan Bhujbal । “मी बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला, कारण…”; छगन भुजबळांनी सांगितला जुना किस्सा
- Girish Mahajan | “… ठेव फोन” गिरीश महाजनांचं काॅल रेकाॅर्डिंग होतय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
