Share

Anil Parab | किरीट सोमय्या सुपारी घेऊन काम करतात ; अनिल परब यांचा आरोप

Published On: 

Anil Parab | मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि अनिल परब (Anil Parab) यांच्यातील सामना पुन्हा रंगला आहे. किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोली दौऱ्यावर गेले आहेत. सोमय्या आज दापोली पोलीस स्टेशनला भेट देऊन साई रिसॉर्ट पाडकामाची माहिती घेणार आहेत. त्यामुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. दरम्यान अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अनिल परब म्हणाले, किरीट सोमय्या हातोडा घेऊन गेले पण हा स्टंट नौटंकी आहे. किरीट सोमय्या यांची नौटंकी आपण आज बघत नाही. असाच हातोडा त्यांनी राणे साहेबांच्या घरी घेऊन जावा. सुभाष देशमुख यांचे घर देखील बेकायदेशीर आहे. आमच्याकडे यादी आहे कीती लोकांची घरे बेकायदेशीर आहेत. केवळ मला बदनाम करायचं आणि अडकवायचं, यासाठी किरीट सोमय्यांचे उद्योग चालू आहेत.

किरीट सोमय्या सुपारी घेऊन काम करत आहेत. त्यांना सुपारी दिली जाते. जे शिंदे गटात गेले त्यांच्याबद्दल बोलायची किरीट सोमय्यांची हिमंत आहे का?. हिंमत असेल तर सोमय्यांनी दाखवावी. या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. काल देखील माझ्यावर एक खोटा खटला दाखल केला गेला. ४२० कलम त्यात लावण्यात आले, असे अनिल परब म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!