Share

महाराष्ट्राच्या मदतीला धावला केरळ, डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत दाखल

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना आता केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे. सरकारच्या विनंती नंतर केरळने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनीही केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्यात अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत सर्वात पुढे दिसत आहेत. दुसऱ्या 50 डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथकही लवकरच मुंबईत दाखल होणार होणार आहे असल्याची माहिती थॉमस इसाक यांनी दिली. हे पथक सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलं असल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिलीय.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नुकतीच केरळ सरकारकडे पत्र लिहून 50 डॉक्टर्स आणि 100 परिचारिका यांची मागणी केली आहे. याचाच निषेध महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनकडून करण्यात आला आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार,या पार्श्वभूमीवर राज्यात तब्बल 50 हजार परिचारिका उपलब्ध आहेत. तरीसुद्धा सरकारकडून केरळवरून परिचारिका मागवणे ही बाब आमच्यावर अन्याय करणारी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

बाहेरील राज्यातील मुलींना सेवेसाठी अथवा प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असणं बंधनकारक आहे. तसा शासनाचा 1968 सालचा आदेश आहे. तेव्हापासून बाहेरील राज्यातील मुलींना प्रशिक्षणासाठी सेवेमध्ये घेणं बंद झालं आहे. सध्या बंधपत्रित आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 2 हजाराच्या वर परिचारिका रिक्त पदे न भरल्यामुळे प्रतिक्षेत आहेत.- इंदुमती थोरात (महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन कार्याध्यक्षा )

सुप्रसिद्ध संगीतकार वाजिद खान काळाच्या पडद्याआड…

अमोल कोल्हेंना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर…मिटकरींचा इशारा

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, पाहणी व मदतीसाठी विरोधी पक्ष नेत्यांचा आजपासून कोकण दौरा

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!