दिल्ली : दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने तळीरामांना चांगलाचं आर्थिक झटका दिला आहे. आजपासून दिल्लीमध्ये दारूवर 70% ‘विशेष कोरोना शुल्क’ लागू केला आहे. त्यामुळे आता 100 रुपयाला मिळणारी दारूची बॉटल आता 170 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांना आपली चैन करण्यासाठी चांगलाचं आर्थिक फटका बसणार आहे.
देशात सोमवारपासून तिसरा लॉकडाऊन कालावधी सुरु झाला आहे. मात्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. तसेच रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तिन्ही झोनमध्ये दारू विकण्यास परवानगी दिली आहे. देशभरातील अनेक दारुची दुकानं उघडली असून तळीरामांनी अगदी प्रथम कर्तव्य मानत दारू खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ही गर्दी आटोक्यात येण्यासाठीचं केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
दिल्लीत दारुच्या बऱ्याच दुकानांबाहेरील गर्दी अनियंत्रित झाल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्याने दुकानं बंद करावी लागली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नाराजीही व्यक्त केली.
ते म्हणाले की, दिल्लीतील काही दुकानांबाहेर गोंधळ पाहायला मिळाला ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्याचं समजलं तर आम्हाला तो परिसर सील करावा लागेल. तसंच तिथे दिलेली शिथिलताही मागे घ्यावी लागेल. दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

