Share

ही भारतीय महिला गाजवतेय WWE चा आखाडा

Published On: 

🕒 1 min read

आतापर्यंत आपण द ग्रेट खलीला WWE च्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना मात देताना पाहिलं मात्र यापुढे एक महिला पैलवान WWE च्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांची धुलाई करताना पहायला मिळणार आहे.कविता देवी असं या महिला रेसलरचं नाव असून महत्वाची बाब म्हणजे द ग्रेट खलीची कविता हि शिष्या आहे .

नारंगी रंगाचा चुडीदार घालून पारंपरिक वेशात जेव्हा रेसलर कविता देवी डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणात आली तेव्हा सगळेच प्रेक्षक तिच्याकडे पाहत बसले.कारण यापूर्वी कोणत्याही रेसलरला प्रेक्षकांनी चुडीदार आणि कंबरेला ओढणी बांधून रिंगणात एण्ट्री घेताना पाहिलं नव्हतं.कविता देवी ही पहिली भारतीय महिला आहे, जी WWE मध्ये सहभागी झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ओढणी कमरेला बांधून प्रतिस्पर्धी महिलेला भारतीय ठोसे लगावून विजय मिळवणं, ही कविता देवीची खासियत आहे.

चुडीदार परिधान करुन, रिंगमध्ये उतरुन प्रतिस्पर्ध्याला मात देणारी कविता देवी, सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.कविता देवीचे रेसलिंग व्हिडीओ न्यूझीलंडची महिला रेसलर डकोटा कायने यूट्यूबवर नुकताच अपलोड केला आहे. ‘मे यंग क्लासिक’ सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. जुलै महिन्यात झालेल्या या सामान्यातले काही व्हिडिओ आता युट्यूबवर अपलोड करण्यात आले आहेत. या सामन्यात कविता देवीचा न्यूझीलंडच्या डकोटा कायकडून पराभव झाला. मात्र कविता देवीची फाईट पाहून इंटरनेट जगतात तिचंच नाव गाजत आहे.हा व्हिडीओ या स्पर्धेतील सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ आहे. या व्हिडीओला अल्पवधीतच 35 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.

kavita-deviकविताची आतापर्यंतची वाटचाल

कविता देवी हरियाणातील मालवी या खेड्यातील राहणारी आहे.WWE मध्ये प्रतिनिधित्त्व करणारी पहिली भारतीय महिला आहे कविता देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्ट क्रीडाप्रकारात भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.कविता देवीने 2016 मध्ये 75 किलो वजनी गटात पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं.क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे हरियाणा सरकारने तिला पोलिस दलात नोकरी दिली.पोलीस दलात ती कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने नोकरीला रामराम ठोकला. 2010 मध्ये ती पोलीस उपनिरीक्षकपदावर निवृत्त झाली.कविता देवीला भारतीय रेसलर ग्रेट खलीने प्रशिक्षण दिलं आहे.

डकोटासमोर कविताचा फारवेळ निभाव लागला नाही. ती पहिल्याच फेरीत सामन्यातून बाहेर पडली. ती सामना हरली असली तरी आपल्या पेहरावानं मात्र तिनं भारतीयांची मनं जिंकली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!