मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांनी मागच्या वर्षी लग्न केलं होत. दोघांचीही जोडी खूप प्रसिद्ध आहे. हे दोघे लवकरच आईबाबा होणार असल्याची गोड बातमी समोर येत आहे. या दोघांनीही ही बातमी सांगितली नसली तरी, त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून ही बातमी पुढे येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिना गरोदर आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. बी टाऊनमधील याजोडीच्या नात्यात आता चिमुकल्या पाहुण्याची एंट्री होणार असल्याचं सांगितलं आहे. कतरिना आणि विकी सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
विकी घेतोय कतरिनाची विशेष काळजी –
विकी कौशल कतरिनासोबत जास्त वेळ घालवताना दिसत आहे. कतरिनाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत याची देखील विकी काळजी घेत आहे. तिच्या मूड स्विंगची देखील काळजी घेत आहे.
कतरीनाच्या जवळच्या लोकांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण असं असल तरी प्रत्यक्ष चित्र फार वेगळ असल्याचं दिसतंय. कतरिना गरोदर असल्याची गोष्ट खरी आहे पण, तीन महिन्यांचा काळही पूर्ण झाला नाही. त्यमुळे त्यांनी ही बातमी जास्त न सांगता गुपित ठेवली आहे. चाहत्यांना अशी आशा आहे की, पुढच्या काही काळामध्ये ते स्वतः गुडन्यूज देतील.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

