Share

‘लोकं मला सांगतात की, एखाद्या मंत्र्याची बायको लोकांच्या थेट संपर्कात राहते हे आम्ही पहिल्यांदा पाहतोय’

Published On: 

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. करुणा या लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या एका फेसबुक व्हिडीओमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

करुणा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्य आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत असून सामाजिक कार्य करताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी लोकांसोबत शेअर केले आहेत. सामान्य जनता आता त्यांच्याकडे समस्या घेवून येत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकं फोन करून बोलतात की वहिनीसाहेब तुम्ही डॉक्टरांशी  बोलून आम्हाला एवढी मदत मिळवून द्या. लोकं मला सांगतात की, एखाद्या मंत्र्याची बायको लोकांच्या थेट संपर्कात राहते हे आम्ही पहिल्यांदा पाहतोय. लोकं मला माझ्या कामामुळे खूप आशीर्वाद देत आहेत असे त्या म्हणाल्या.

पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती करून सांगतले की,’उद्धवजी, कोरोनाच्या संकटकाळात आपले मंत्री,आमदार यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींना आपले फोन सुरु ठेवायला सांगा. लोकांच्या समस्या त्यांना ऐकून घ्यायला सांगा. लोकांना खूप बरे वाटते जेव्हा एखादा पावरफुल व्यक्ती त्यांच्यासाठी फोन करतो. काळजी करू नका मी आहे एवढे जरी ते बोलले तरी सामान्यांना बरे वाटते.ही वेळ राजकारण करण्याची नसून कोरोनाकाळात पुण्य कमावण्याची संधी आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान,करुणा यांनी आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे जनसामान्यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. कोरोनामुळे सध्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून मुख्यमंत्र्यांनी यातून लोकांना बाहेर काढावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!