🕒 1 min read
बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बंगळुरुतील राहत्या घराबाहेर त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असून देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
55 वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास तिघा आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला.
मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.
देशात उजव्या विचारांच्या राजकारणाच्या विरोधात बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरू असून त्या मालिकेत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची मंगळवारी बंगळुरू येथे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांच्या हत्येनंतर राजकारणी आणि कला-साहित्य विश्वातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर ट्विटच्या माध्यमातून टीका करणे सुरू केले आहे.
वाचा कोणी काय दिली प्रतिक्रिया
Dhabolkar , Pansare, Kalburgi , and now Gauri Lankesh . If one kind of people are getting killed which kind of people are the killers .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) September 5, 2017
The truth will never be silenced. Gauri Lankesh lives on in our hearts. My condolences &love to her family. The culprits have to be punished
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 5, 2017
Terrible news from Bengaluru about the heinous murder of Gauri Lankesh. I condemn all acts of violence against journalists.
— Col Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) September 5, 2017
Another liberal, rational voice snuffed out by "unidentified assailants". Gauri Lankesh RIP. Dabholkar, Kalburgi, Pansare. Who killed them?
— Renuka Shahane (@renukash) September 5, 2017
#Kalburgi, #Pansare, #Dabholkar and now #GauriLankesh. This is killing of ideology. Govt has to take this seriously and act. @PTI_News
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) September 5, 2017
Saddened at the killing of journalist Gauri Lankesh in Bengaluru. Most unfortunate. Very alarming. We want justice
— Mamata Banerjee (@MamataOfficial) September 5, 2017
Shocked to hear about the killing of journalist @gaurilankesh. Perpetrator of this murder must be punished. RIP????????#gaurilankesh
— Supriya Sule (@supriya_sule) September 5, 2017
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

