बंगळुरू: कमी वेळात जास्त पैसा कमवून श्रीमंत होण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. मात्र शॉर्टकट मार्ग नेहमीच धोकादायक ठरत असतो असं म्हणतात आणि त्याचं उदाहरण कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे बघायला मिळाले. लाच घेणे आणि लाच देणे या गोष्टी आपल्याकडे सर्रास बघायला मिळतात. आशातलाच प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) एका अभियंत्याच्या बाबतीत घडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यूडीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणाऱ्या एस. एम. बिरादार (SM Biradar) याच्या ठिकाण्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला आहे. छापा टाकल्यानंतर दोन घरं, बंगळुरुमधील एक जागा, तीन कार, एक दुचाकी, एक स्कूल बस, दोन ट्रॅक्टर, ५४.५० लाख रुपयांची रोकड, ३६ एकर शेतजमीन, १०० ग्रॅम दागिने आणि १५ लाख रुपये किमतीच्या घरगुती वस्तू जप्त केल्या आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या या धाडीत आणखी एक अनोखा प्रकार उघडकीस आला. या अभियंत्याने चक्क पाईपलाईनमध्ये तब्बल १३ लाखांच्या नोटा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. या पाईपमधून नोटा काढतानाचा विडियो देखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. घरातील रेन वॉटर हारवेस्टिंगच्या पाईपमध्ये या लाचखोर अभियंत्याने १३ लाखांच्या नोटा लपवल्याचे आढळून आले.
महत्वाच्या बातम्या:
- परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला? ‘या’ निवृत्त अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
- इसिसच्या निशाण्यावर आरएसएसचे नेते?, भारतात पाठवले टिफिन बॉम्ब
- अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम अन् सरकारी नोंदीसाठी हिंदू? मलिकांचा वानखेडेंवर नवा आरोप
- टॉस जिंकून रहाणेने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय; श्रेयस अय्यरचे झाले कसोटी पदार्पण
- कर्मचारी संघटना वेतनवाढीच्या प्रस्तावानंतरही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

