Share

करमाळा : कोरोनाच्या संकटाची पुरेशी जाणीव झाल्यामुळे नागरिकांकडून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: 

करमाळा : जगभरात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. राज्यात देखील कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारच्या या देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यू चे आवाहन केले होते.या आवाहनला करमाळा तालुक्यातील जनतेचा कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नेहमी गजबजणारे रस्तावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. करमाळा तालुक्यातील जेऊर,केम,कोर्टी,कंदर येथील प्रमुख बाजारपेठा १००% बंद आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, दुकाने बंद असल्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या कामगारांची लगबग व गर्दी कोठेही दिसत नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. रिक्षा व टॅक्सी देखील पाहायला मिळत नाहीये.कोरोनाच्या संकटाची पुरेशी जाणीव झाली असल्यामुळे नागरिकांकडून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळल्याचे दिसुन आले.

दरम्यान, ‘जनता कर्फ्यू’ला तुळजापूरवासियांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यात स्वयंस्फूर्त संचारबंदीमुळे सर्व रस्त्यांवर शुकशुकाट अनुभवायला मिळला . तिर्थक्षेञ तुळजापूर तर प्लेग साथ विद्यापीठ नामांतर आंदोलन नंतर प्रथमच करोना मुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसुन आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!