Share

इतिहासात अर्णब यांना हिरो म्हणून ओळखलं जाईल – कंगना रनौत

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. काल, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने मला मदत करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी तळोजाकडे येताना केली आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे, मला बेल द्या, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यानंतर अर्णबच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगणा राणावत पुढे आली आहे. अर्णब गोस्वामी यांना जितकं टॉर्चर केलं जाईल ते तिकडे कणखर होऊन बाहेर येतील असं कंगणा राणावतने म्हटलं आहे. तिने या संदर्भात एक व्हीडिओ ट्विट केला आहे. तसेच इतिहासात अर्णब यांना हिरो म्हणून ओळखलं जाईल असंही कंगणा म्हणाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीया, चाईल्ड ट्रॅफिकिंग आणि सोनिया गांधी यांचं खरं नाव घेतल्यामुळे टॉर्चर केलं जात असल्याचं कंगणा राणावतने म्हटलं आहे. तर, अन्वय नाईक प्रकरणात महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीविरोधात केलेल्या कारवाईवरही कंगणाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दुसरीकडे अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. अर्णबची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी आता राज्य सरकारला इशारा दिला आहे.

राम कदम यांनी ट्विट करत आपण आज ( ९ नोव्हेंबर ) रोजी सकाळी ११ वाजता अर्नब गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचं सांगितल आहे. तर ज्याच्यात हिम्मत आहे त्याने अडवून दाखवावे अस सरळ आव्हान देखील कदम यांनी दिले आहे. १३० कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपण अर्नबला भेटायला जाणार असल्याचे राम कदम म्हणाले आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील राम कदम यांनी ट्विट करत सरकारला इशारा दिला होता. महाराष्ट्र सरकारने हे लक्षात ठेवावे की अर्णबच्या केसाला जरी धक्का लागला तरी या देशातील जनता ते सहन करणार नाही.दुर्योधनाचा अहंकार देखील टिकू शकला नाही हे विसरू नका. लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल असं कदम यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!