Share

“कुठे हरवलास पाखरा, परत ये रे आमच्या लेकरा”, आमदार विजय रहांगडालेंची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट

Published On: 

वर्धा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले (Vijay Rahangdale) यांचा मुलगा अविष्कार रहागंडाले (Avishkar Rahangdale) याचा मंगळवारी अपघातात मृत्यू झाला. मुलगा अविष्कारच्या निधनाने विजय रहांगडाले यांना मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या आठवणीत त्यांनी भावूक होत फेसबुकवर कविता पोस्ट केली आहे. यातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आमदार विजय रहांगडालेंची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट-

आज काळीज फाटलं,
त्यानं आकाश गाठलं;
अविष्कार आमचा हिरा,
होता आनंदाचा झरा;
डॉक्टर नव्हते खमारी गावात,
होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात;
बापाचे स्वप्न पूर्ण करण्या,
गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;
लागली कुणाची नजर,
आज दगडालाही फुटली पाझर;
गेला तरुण वयात सोडून,
केलेले सारे वादे तोडून;
तुझी आई आजही वाट पाही,
तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;
कसे समझवू तिला,
तू परत येणार नाहीस मुला;
कुठे हरवलास पाखरा,
परत ये रे आमच्या लेकरा;
गेलास अविष्कार आम्हाला सोडून,
तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून
आज आहे मातम सगळीकडे,
आई बाबा संगे सारा गाव ही रडे.

अशी भावनिक पोस्ट करत आमदार विजय रहागंडाले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील (Wardha Accident)सेलसुरा गावातील नदीच्या पुलावर चारचाकी खाली कोसळल्याने अविष्कारसह इतर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अविष्कारवर गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या खमारी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या जाण्याने रहांगडाले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या भावना आमदार विजय रहागंडाले यांनी शब्दांत व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!