पुणे : कोविड काळातील राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या सामाजिक, विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्य विश्वस्त मंडळातील सदस्यांनी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या विविध सामाजिक तसेच विधायक कार्यासंबंधी माहिती दिली. तसेच उपस्थित विविध वैद्यकीय संघटना व कलावंत प्रतिनिधींनी ट्रस्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद सुनील काळे यांना गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप!
याच मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेत शिंदे यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेस ने पुरोगामी म्हणून घेऊ नये. कारण ज्या व्यक्तीचा चेहरा हिंस्र वृत्तीचा आहे, जो व्यक्ती हत्येचे समर्थन करून गुन्हेगाराचे दुकान चालवतो तो व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर असणार हे भयानक आहे. कारण शरद पोक्षेंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज पर्यंत आंदोलने करून गुन्हे दाखल करून घेतलेली आहेत. बहुजन समाजातील खरा कलाकार उपाशी मरत आहेत. मोठे कलावंत लाॕकडाऊनमुळे फर्स्टस्ट्रेशन मध्ये आहेत आणि हे शहाणे विषारी चेहऱ्याच्या माणसाला मदत करतात हेच विचारांच्या पलीकडचे आहे. ‘नेत्यांनो लक्षात ठेवा, जे पेराल तेच उगवणार आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
संतोष शिंदे म्हणाले, ‘ नथुराम गोडसे भक्त शरद पोंक्षे राष्ट्रवादी काँग्रेस स्टेजवर…! यांच्या मुळेच ‘पुरोगामी’ शब्द बदनाम झालाय…??? कदाचित ही विचारांशी गद्दारी नाही का हे पवार साहेबांनी स्पष्ट करावं. कारण गांधींची हत्या करणारा राष्ट्रद्रोही माणूस यांच्यासाठी चांगला कसा…?
शरद पोंक्षे तोंडाचा मेकअप उतरल्यावर प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनात गांधी हत्येचा आणि गोडसेचा उदो-उदो करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचा विरोध कायम आहे. जयंत पाटील यांनी शरद पोंक्षे यांना प्रवक्ता करू नये म्हणजे मिळवलं, कारण ते काहीही करू शकतात असा टोला देखील शिंदे यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कॅडर बेस नाहीत. कदाचित ते हुजरे असल्यामुळे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून कार्यक्रमात कोणालाही बोलवल्यावर टाळ्या वाजवतात. कलाकाराच्या अभिनेता म्हणून केलेल्या भूमिका आणि राजकीय मत-भूमिका वेगवेगळ्या असतात. पोंक्षे ही व्यक्ती नाहीये, प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला वेळोवेळी भक्कम विरोध करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचा फोटो पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा प्राण तळमळला असेलअसा दावा देखील त्यांनी केला आहे.
पोंक्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर येणे हे काही (जयंत पाटील साहेब) नेत्यांना नवीन नसेल. कारण यांनीच असले कट्टर विषारी लोक आजपर्यंत सांगलीसह महाराष्ट्रात पोहोचले आहेत. शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या स्टेजवर पाहून त्यांच्यात काही कट्टर पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या नेत्यांचा प्राण फार तळमळला असेल…! घडलेली घटना दुर्दैवी आहे असं संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी याप्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका फेसबुक पोस्ट मधून स्पष्ट केली आहे. सनातनी शरद पोंक्षेचा NCP सोबत कसलाही संबंध नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सरचिटणीस या नात्याने तो व त्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी लक्ष्मण माने इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे नाट्य परिषदेला व इतर घटकांना कोरोना संकट काळी मदत केली. त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी पोंक्षे परिषदेचा सरचिटणीस नात्याने व्यासपीठावर उपस्थित होता अशी सारवासारव त्यांनी केली आहे.
शहीद सुनील काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार
लवांडे पुढे म्हणाले,त्या नाट्य परिषदेच्या कार्यकारी मंडळात सर्व विचारधारेचे सदस्य आहेत. त्यांच्या व्यक्तिगत विचारांचा कसलाही पक्षाशी संबंध नाही. पोंक्षे बरोबर पक्षाचे व्यक्तिगत मतभेद कायम आहेत. पक्षाशी त्याचा कुणीही संबंध जोडू नये. नथुराम गोडसे समर्थकांना विरोध कायम राहील. त्या कार्यक्रमाचा सोशल मिडियाद्वारे अपप्रचार गैरसमज करू नये असं म्हटलं आहे.

