🕒 1 min read
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सी.बी.आय द्वारे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर काल देशमुख यांनी राजीनामा दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला आहे. देशमुखांकडील गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यासही त्यांनी मंजूरी दिली आहे.
दरम्यान,देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.दिलीप वळसे पाटील यांनी आज गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यासोबतचा युवक कारकिर्दीतील फोटो शेअर करुन अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
माझे जुने मित्र ना. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा!@Dwalsepatil pic.twitter.com/wd65NfhCIb
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 6, 2021
माझे जुने मित्र नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त… कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आता गृहमंत्री या नवीन जबाबदारीसाठीही जयंत पाटील यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- रोहित शेट्टीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; ‘सूर्यवंशी’चं प्रदर्शन पुन्हा ढकललं पुढे
- ‘माझे प्राण माझीच जबाबदारी’ या भूमिकेत नागरिकांनाच शिरावे लागेल’
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा
- कौतुकास्पद : ‘या’ शेतकऱ्याने केले वर्षभर फळ देणारे आंब्याचे वाण विकसित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
