Share

Jayant Patil | जयंत पाटील थेट अध्यक्षांवर संतापले, अपशब्दाचा वापर ; सत्ताधाऱ्यांकडून निलंबित करण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | नागपूर : शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधानसभेत (Winter Session 2022) दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यानंतर सभागृहात आमदारांचा गदारोळ सुरू झाला. अध्यक्षांना पाचवेळा सभागृह तहकूब करावे लागले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. विरोधकांनी देखील यावर बोलण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचे अनेक सदस्य बोलले मात्र विरोधकांमध्ये अजित पवार सोडून कुणाला बोलू दिले नाही. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सवाल केला.

दिशा सालियन प्रकरणावर भास्कर जाधव यांना बोलून द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली. मात्र, अध्यक्षांनी त्यास नकार दिला. यावर अजित पवार संतापले. तुम्हाला सभागृह चालवायचे नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

यावेळी जयंत पाटील यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप होत आहे. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. जयंत पाटील यांचे एक वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. दरम्यान या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक सुरु आहे.

काय म्हणाले जयंत पाटील-

आमदार भास्कर जाधव यांना सभागृहात बोलू न दिल्यामुळे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. यावेळी  ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ , असा शब्द जयंत पाटील यांनी वापरला. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान जयंत पाटील यांच्यावर कुठली कारवाई होणार?, त्यांचे निलंबन होणार की त्यांना केवळ समज दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!