Share

#आपुलकी_गृह : धैर्यशील मानेंनी घालून दिला नवा आदर्श, स्वतःचे घर दिले विलगीकरणासाठी

Published On: 

कोल्हापूर : भाजप खा. धैर्यशील माने यांनी वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कोरोनामुळे भाऊबंदकीत जिव्हाळा टिकून राहण्यासाठी नवा कोल्हापुरी पॅटर्न आणत ‘आपुलकी गृह’ ही नवा उपक्रम सुरु केला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला सुरवात माने यांनी स्वतःपासून केली.

रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरण व्हावे लागते. मात्र आता शहरांमधून अनेक लोक हे गावात येत आहेत. त्यामुळे एवढ्या जणांना विलगीकरण करून ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणावर ताण येत आहे.

हाच ताण कमी करण्यासाठी उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी ‘कोल्हापुरी पॅटर्न’चा विचार दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर त्यांची त्यांच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी राहायचे अशी त्यांची संकल्पना आहे. या संकल्पनेची सुरवात धैर्यशील माने यांनी तालुक्‍यातील रुकडी येथील स्वत:चे घर देऊन आज केली. कराड येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रथमेश लोहार काही दिवसांपूर्वी आपल्या गावी रुकडीमध्ये आला. कोव्हिड केअर सेंटरमध्ये त्याच्या स्वॅबचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज त्याची खासदार माने यांनी स्वत:च्या घरी राहण्याची सोय केली आहे.

याबाबत माने म्हणाले की, गावामध्ये येणारे आपलेच नातेवाईक आहेत. त्यांच्यासाठी गावा-गावाने पुढे यावे आणि आपुलकीच्या ओलाव्याचा आधार द्यावा. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा, असे आवाहन करतानाच गावामध्ये भाऊबंदकीत जर काही कडवटपणा असेल तर तोही निघून जाईल आणि खऱ्या अर्थाने बंधूभाव वाढीस लागेल, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

रक्तदानासाठी पुढाकार घ्या; राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन

राज्यपालांच्या बैठकीला पाठ फिरवून CM ठाकरेंनी दिला दणका !

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!