नवी दिल्ली : जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात नवा विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी विकेट्स असूनही परदेशी भूमीवर 100 बळी घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे. बुमराहने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 104वी विकेट घेताच परदेशी भूमीवर 100 बळी घेतले.
भारतासमोरच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज डीन एल्गर आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांनी चौथ्या दिवसाच्या खेळात फलंदाजी केली आणि ही भागीदारी तोडणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला गोलंदाजी देण्यात आली. आणि त्याने व्हॅन डर डुसेनला परदेशी भूमीवर आपला 100 वा बळी बनवले. यानंतर केशव महाराजलाही बुमराहने बाद केले. परदेशी भूमीवर सर्वात कमी 100 विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराहनंतर पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचे नाव येते. आमिरने एकूण 118 विकेट्समध्ये परदेशात 100 बळी पूर्ण केले.
अंतिम सत्राच्या शेवटच्या तासात बुमराहने दोन विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला आणखीन आणल. आता टीम इंडिया विजयापासून फक्त 6 विकेट दूर आहे. पाचव्या दिवशी हवामान कसे राहील हे पाहावे लागेल. पावसामुळे टीम इंडियासाठी परिस्थिती आणखी बिघडू शकते.
Stumps on Day 4 of the 1st Test.
South Africa end the day on 94/4. #TeamIndia 6 wickets away from victory.
Scorecard – https://t.co/eoM8MqSQgO #SAvIND pic.twitter.com/IgRuammbPo
— BCCI (@BCCI) December 29, 2021
दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 94 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्यांना आता विजयासाठी आणखी 211 धावांची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हे सोपे काम नसेल. पाचव्या दिवशी खेळपट्टीतील तडे अधिक उघडतील. अशा स्थितीत चेंडूची अनियमित उसळीही दिसू शकते. असेच काहीसे चौथ्या दिवशीही पाहायला मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- महात्मा गांधींबद्दल ‘ते’ वक्तव्य आले अंगलट; कालीचरण महाराजांना अटक
- नसिरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

