Share

ठराविक लोकांचीच कामे करण्याचे प्रकार खपवून घेणार नाही – आमदार संदीप क्षीरसागर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वीज, स्वस्त धान्य, आरोग्य सेवा, पाणी, चांगले शिक्षण या योजना आणि सुविधा ग्रामीण भागातील सामान्यांना मिळाल्या पाहिजेत. प्रशासनाने यात हलगर्जीपणा केलेला खपवून घेणार नाही, असे निर्देश आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले.

क्षीरसागर यांनी मंगळवारी उमरद जहागीर येथे जनता दरबार घेतला. गावात स्वस्त धान्य मिळत नाही, शाळेला शिक्षक नाहीत, रोहित्र जळाल्याने गाव महिन्यापासून अंधारात आहे.

तलाठी गावात येत नाहीत अशा ढीगभर समस्यांचा आणि तक्रारींचा पाढाच ग्रामस्थांनी यावेळी वाचला. क्षीरसागर म्हणाले, जनतेची कामे करण्यासाठी सतर्क राहावे, मुख्यालयी न येणाऱ्या तलाठी-ग्रामसेवकांवर कारवाई करावी, ठराविक लोकांचीच कामे करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

‘पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या योजना सामान्यांना मिळाल्या पाहिजेत’. असेही ते म्हणाले. तहसीलदार सचिन खाडे, कृषी विभागाचे दिलीप जाधव, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सुजित बडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता भारंबे, सानप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गंगाधर घुमरे, बबन गवते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206144375123664898?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206141139641757697?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!