Share

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आणि चीनच्या वर्तनावरुन देशात राजकीय चिखलफेक होणे दुर्दैवी- देवरा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि चीनमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. कॉंग्रेसनेते खा.राहुल गांधी रोज सरकारवर याच मुद्द्यावरून टीका करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्वीटच्या माध्यमातून मोठे वक्तव्य केले. त्यांचे ट्वीट म्हणजे काँग्रेससाठी घरचा अहेर ठरला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला शब्द

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आणि चीनच्या वर्तनावरुन देशात राजकीय चिखलफेक होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. चीनच्या कृत्याचा सर्वांनी एकजुटीने निषेध करणे आवश्यक आहे. एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे, असे देवरा म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अप्रत्यक्षपणे कान काल टोचले आहेत.राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे, असा सल्ला पवार यांनी राहुल यांना दिला आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी भारत-चीन वादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चांगलेच शालजोडीतून लगावले आहेत.

पवार म्हणाले, काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला हे माहीत नाही. पण १९६२च्या युद्धानंतर चीनने आपला भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीनने सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही, असं सांगतानाच जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात मी असताना काय घडलं याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये.

दरम्यान, आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक निवेदन प्रकाशित करून कॉंग्रेसची नेमकी भूमिका काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय म्हटलं आहे या निवेदनात ?

चीन प्रश्नी काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सीमा सुरक्षेबाबत राहुलजी गांधी सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे. इ. स. १९६२ व आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.

४५ वर्षात चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता. गलवान खो-यात चीनच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेस प्रमाणेच शरद पवार साहेबांनाही असेलच.

राहुलजी गांधीजी जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. राहुलजींची चिंता ही देशाच्या अखंडतेशी सबंधित आहे. आजही मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही. अशावेळी गप्प बसून कसे चालेल? भाजपने काँग्रेसच्या सुचनांकडे आणि प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघू नये! प्रश्न देशाच्या अखंडतेचा आहे, त्यामळे राहुलजी आणि काँग्रेस पक्ष प्रश्न विचारणारच आहे.

येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना चांगला धडा शिकवू – लोणीकर

शरद पवार साहेब काय बोलले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या विधानावरून माध्यमांनी निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीनचिट आणि राहुलजींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आतताईपणा करू नये. मला खात्री आहे, पवार साहेबही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!