🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर आता राज्यातील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तर १ मे रोजी असा निर्णय घेणे ही दुर्दौवी घटना आहे, अशी प्रतिक्रिया अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला निर्णयाविरोधात आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता राष्ट्रादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे विशेष महत्व आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्याचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रकार आहे. आजही मुंबई महाराष्ट्राला आणि देशाला पोसते. एवढा व्यवहार मुंबईतून होतो. त्यामुळे महाराष्ट्र दिनीच हा प्रकार करणे हे दुर्दैवाचं आहे.
दरम्यान कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी देखील या निर्णयावर टीका केली. IFSC चे मुख्यालय गुजरात ला जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना IFSC मुंबईत BKC येथे असेल असे आश्वासन दिले होते. पण आता, भाजप शांत का, असा थेट सवाल उपस्थित केला आहे.


