Share

‘प्रभाग किती नगरसेवकांचा हा प्रश्न नाही, निवडणूक जिंकण्याचाच आमचा निर्धार आहे’

Published On: 

पुणे – महाविकास आघाडी सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

स्थानिक नेत्यांच्या मते, एक सदस्यीय वॉर्डरचना चांगली होती. बहुसदस्यीय रचना झाल्यावर आधीच्या दुसऱ्या वॉर्डात कसे मतदान होते, यावरही लक्ष द्यावे लागेल. तसेच आपल्यासोबतचे उमेदवार कसे असतील, यावरही बरेच काही अवलंबून आहे. अनेक नगरसेवक खूप मेहनत घेऊन आपापल्या वॉर्डासाठी कार्य करत असतात. मात्र प्रभाग रचना विस्तारल्याचा फटका अशा कार्यकर्त्यांना बसेल असं सांगितले जात आहे.

दरम्यान, या निर्णयावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रभाग किती नगरसेवकांचा हा प्रश्न नाही. निवडणूक कोणत्याही पद्धतीने झाली तरी निवडणूक जिंकण्याचा निर्धार आहे. यापूर्वी एक वॉर्ड एक नगरसेवक आणि त्यानंतर एक प्रभाग दोन नगरसेवक या पद्धतीने पक्षाने निवडणूक लढविली आहे. प्रभाग रचना आणि तो किती नगरसेवकांचा याचा विचार न करता निवडणूक लढविली जाईल असं ते म्हणाले.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप  म्हणाले, शहराचे वाढते भौगोलिक क्षेत्र पहाता बहुसदस्यीय पद्धतीची आवश्यकता होती. महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. यापूर्वी तीन नगरसेवकांचा प्रभाग असताना राष्ट्रवादीला यश मिळाले होते. आताही पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील. भाजप विरोधातील रोष आगामी निवडणुकीत पुढे येईल.

दरम्यान, या निर्णयाबाबत बोलताना पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, मुंबई वगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे. खरं तर हा निर्णय करायला राज्य सरकारने उशीरच केला आहे. परंतु तीनही पक्षात कुठल्याही विषयात एकवाक्यता नसल्याने ही दिरंगाई अपेक्षित होती. पुणे महापालिकेत प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपच्याच बाजूने राहणार असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!