Share

‘आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच’

Published On: 

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज(१५ नोव्हें.)पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधनानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

यासंदर्भात दानवे यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,’अवघ्या महाराष्ट्राचे भुषण,पद्मविभूषण,जेष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समजली.. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो.तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती. छत्रपती शिवाजीरायांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवणारे,अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून जनसमुदायाला शिवचरित्राची भुरळ पाडणारे बाबासाहेब पुरंदरे! ओजस्वी वाणी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेल्या बाबासाहेबांनी महाराष्ट्रातील प्रत्येक घरांत शिवचरित्र पोहचविले. वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा,वाचन,अभ्यास,नवनवीन प्रकल्प, हे सारे नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते. आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच.’

दरम्यान, रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!