🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनासाठी नवे रुग्णालय उभारले जात आहे. मात्र या रुग्णालयासाठी मागवण्यात आलेली निविदा सदोष असल्याचा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच रुग्ण, डाँक्टर, नर्स यांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? असा सवाल शेलार यांनी प्रशासनला विचारला आहे.
मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र असे असूनही मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील आव्हानाचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात चीनच्या धर्तीवर कोरोना रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
आशिष शेलार यांनी कोरोना रुग्णालयासंदर्भात ट्विट करून सवाल उपस्थित केले आहेत. यात ते म्हणतात की, कस्तुरबा रुग्णालयाच्या परिसरात चीनच्या धर्तीवर कोरोना विशेष रुग्णालय उभारण्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. मात्र या निविदेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे अशा संवेदनशील कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांचीच प्रकृती तपासण्याची गरज आहे. त्या सल्लागारांच्या पालिकेने वेळीच चाचण्या करुन घ्याव्यात, असे शेलार यांनी लिहिले आहे.
कस्तुरबा रुग्णालयाच्या परिसरात चीनच्या धर्तीवर कोरोना रुग्णालय उभारण्यासाठी अनेक त्रुटी असलेली निविदा महापालिकेने काढली आहे. त्यामुळे अशा संवेदनशील कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांचीच "प्रकृती" तपासण्याची गरज आहे.त्या सल्लागारांच्या पालिकेने वेळीच चाचण्या करुन घ्याव्यात (1/2)
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 27, 2020
तर पालिकेने काढलेल्या निविदेत शीतकरण, संसर्ग रोखणारी यंत्रणा,विजेचे ट्रान्सफॉर्मर आणि दाब या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख नाही. हा विलगीकरण कक्ष असल्याने येथे शस्त्रक्रिया होणार नाही तर मग निविदेत नायट्रस ऑक्साईड कशासाठी? रुग्ण, डाँक्टर, नर्स यांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? असा सवाल विचारला आहे.
निविदेत शीतकरण, संसर्ग रोखणारी यंत्रणा,विजेचे ट्रान्सफर व दाब या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख नाही. हा विलगीकरण कक्ष असल्याने शस्त्रक्रिया होणार नाही तर मग निविदेत नायट्रस ऑक्साईड कशासाठी? रुग्ण, डाँक्टर, नर्स यांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 27, 2020
दरम्यान कोरोनाने मुंबईत बऱ्याचं जणांना विळख्यात घेतले आहे. आतापर्यंत मुंबईत ५ हजार ४०७ जण हे कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या दोन दिवसात मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी येणारे पुढचे काही दिवस अधूक जोखमीचे असणार आहेत. त्यात आता केंद्र सरकारच्या असेसमेंट टीमने मुंबईबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. जर मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर शहरात १५ मे पर्यंत ७५ हजार कोरोना रुग्ण आढळतील असे भाकीत असेसमेंट टीमने केले आहे.
मारुती कंपनीच्या कार महागल्या, खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
