मुंबई : गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रेनू पारिख हिला कोरोनाची लागण झाली आहे. श्रेनूने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली.
अभिनेत्री श्रेनू पारिखने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे कि, ‘“काही दिवसांपूर्वी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी रुग्णालयता अॅडमिट असून हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी देवाकडे प्रार्थना करा. जर योग्य काळजी घेऊन सुद्धा जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली तर असं समजा की एक अदृश्य राक्षस तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढायचं आहे. त्यामुळे कृपया काळजी घ्या”.
पुढे श्रेनूने असे लिहिले आहे कि, ‘मी मनापासून कोरोना वॉरियर्सचे आभार मानते. या कठीण प्रसंगात ते प्रत्येक रुग्णाची व्यवस्थित काळजी घेत आहेत’.
दरम्यान, अभिनेत्री श्रेनू पारिख ही टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. ‘भ्रम-सर्वगुण संपन्न’ या मालिकेत ती झळकली होती. या मालिकेत श्रेनू निगेटीव्ह भूमिकेत होती. यानंतर इश्कबाज, इस प्यार को क्या नाम दूं, दिल बोले ओबेरॉय, ब्याह हमारी बहु का अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली.
अमिताभ-अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग
अमिताभ नंतर मुलगा अभिषेक बच्चन याला देखील कोरोनाची लागण
आणखी एका मालिकेच्या सेटवर सापडला कोरोना रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

