नांदेड – राज्यात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED मार्फत होत असलेल्या चौकशीचा विषय चर्चेचा मुद्दा बनला आहे. यातच माजी आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात राजकीय खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला होता.
याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एक भीती व्यक्त केली होती. राजकारणात उद्या नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो त्यामुळे हे राजकीय दृष्ट्या अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली होती.
NIA ने मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दृष्टीने मेन टार्गेट ठेवले पाहिजे. परंतु त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन त्यादृष्टीने सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार देशात भाजपने सुरू केलेला दिसतो असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.परमवीरसिंग यांना आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आरोप केला आहे म्हणजे याअगोदर त्यात तुम्ही सहभागी होतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
कुणीतरी ‘अ’ आणि ‘ब’ चं नाव घेत असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर ही अत्यंत चुकीची पध्दत आहे. असंच घाबरवण्याचं काम केंद्रसरकारच्या एजन्सी करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू झालं आहे असं गंभीर विधानही जयंत पाटील यांनी यावेळी केले. दरम्यान, पाटील यांनी केलेल्या या विधानांचा विचार करायचा झाल्यास ही विधाने अतिशय हास्यास्पद आहेत असचं म्हणता येईल. राजकीय आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात याशिवाय या प्रकरणात कोण दोषी आणि कोण निर्दोष आहे हे ठरवण्याचे काम न्यायालयाचे आहे. आरोप झाले म्हणून कोणत्याही नेत्याचे करियर उधवस्त होऊ शकत असते तर मग राजकारण वेगळ्याच दिशेने गेले असते.
या देशाने आणीबाणीचा काळा काळ अनुभवला तरीही या देशातील लोकशाही आबादित राहिली. या देशावर अनेक संकटे आली तरीही या देशातील लोकशाहीला कुणी नख लावू शकले नाही मग महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चौकश्या झाल्याने लोकशाही कशी उधवस्त होऊ शकते याचे उत्तर पाटील यांनीच द्यावे. तपास यंत्रणांचा कुणी चुकीच्या पद्धतीने वापर करत असेल तर त्याचा निषेध हा नोंदवला पाहिजे मात्र लोकशाही उधवस्त होईल वगेरे भीती व्यक्त करून जनतेमध्ये संभ्रम वाढवण्याचे काम कुणीही करू नये.
उद्या नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करत असेल तर त्या आरोपांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि दोषी असतील तर त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे. राहिला प्रश्न यंत्रणांच्या वापराचा तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देखील अशाच चौकश्यांचा सामना केला आहे मग त्यावेळी लोकशाही धोक्यात कुणी आणली होती याचे देखील उत्तर पाटील देतील काय ? भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर असणाऱ्या एका बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी आता पुन्हा केली जाणार आहे त्याबाबत पाटील यांचे काय म्हणणे आहे हे देखील त्यांनी जाहीरपणे सांगायला हवे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता चित्रा वाघ यांच्या खांद्यावर चंद्रकांतदादांनी सोपवली ‘विशेष’ जबाबदारी !
- व्हीप म्हणजे काय?, तो का काढतात?; जाणून घ्या सविस्तर
- विधानसभा अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ?
- उद्धवजी… जबाबदारी एकमेकांवर ढकलून लसीकरण मोहीम यशस्वी होईल का ?
- समता फाऊंडेशनचे उल्लेखनीय कार्य! ३० हजार जणांचे मोफत लसीकरण

