🕒 1 min read
मुंबई : आयपीएल सुरु होण्याआधी चेन्नई सुपर किंग्ज इतके दिवस संकटांच्या गर्तेत उभे होते,आता त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की टीमचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला भारताचा व्हिसा मिळू शकला नाही, ज्यामुळे त्याचे आयपीएल २०२२ मध्ये समावेश अनिश्चित होते. पण आता CSK साठी एक दिलासादायक बातमी आली आहे. मोईन अलीला व्हिसा मिळाला आहे.
बुधवार, ३० मार्चपर्यंतच तो मुंबईत पोहोचू शकेल असे वृत्त आहे. भारतात पोहोचल्यानंतर मोईनला (moeen ali) अनिवार्यपणे ३ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याला पहिल्याच सामन्यात बाहेर पडावे लागले आहे. पण मोईन अली सीएसकेच्या दुसऱ्या सामन्यापासून निवडीसाठी उपलब्ध असेल. चेन्नईचा दुसरा सामना ३१ मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जने अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला IPL 2022 साठी ८ कोटींमध्ये रिटेन केले आहे. काही दिवसांपूर्वी मोईनला भारताचा व्हिसा मिळत नसल्याच्या बातम्या येत होत्या. वास्तविक, अलीने २० फेब्रुवारी रोजी व्हिसासाठी अर्ज केला होता, परंतु २० दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्याला व्हिसा मिळू शकला नाही. आता कागदपत्रे मिळाल्यानंतर तो पुढील फ्लाइटने भारताला रवाना होईल, असेही मोईनने यापूर्वी फ्रँचायझीला सांगितले होते. आता त्याच्या आगमनाच्या बातमीने व्हिसल पोडू आर्मीला हायसे वाटते आहे.
महत्वाच्या बातम्या
- “जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत…”, करुणा मुंडेंनी व्यक्त केली इच्छा
- नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन
- IPLपूर्वी जडेजाला मिळाली गूड न्यूज; तर रोहितला बसला जबर धक्का!
- पत्नीला ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट दाखवण्यासाठी ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याने केला संपूर्ण थिएटर बुक
- “सत्तेच्या माध्यमातून टोल कलेक्शन”- जयदत्त क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
