Share

IPL 2022 : विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर मायकल वॉनचे भाष्य; म्हणाला ‘लग्नापुर्वीचा विराट हो’

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली(Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. विराट आयपीएल (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात तीन वेळा झिरोवर बाद झाला आहे. त्याची निराशजनक कामगिरी पाहता क्रिकेट जगतातून अनेक दिग्गज त्याला सल्ले देताना दिसत आहेत. अशातच इंग्लडचा माजी कर्णधार मायकल वॉननेदेखील विराटला खास सल्ला दिला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी विराटला खेळातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला मात्र, वॉनने त्याला १० वर्षापूर्वीचा विराट होण्याचा सल्ला दिला आहे.

वॉनने एका स्पोर्ट्स वेबसाइटशी बोलताना विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर भाष्य केले. तो म्हणाला, फाफ डुप्लेसिसने विराट कोहलीशी चर्चा केली असेल. आणि या चर्चेदरम्यान १० वर्ष मागे जाण्याचा विराटला सल्ला दिला असेल. असा अंदाज वॉनने लावला.

तो पुढे म्हणाला, लग्न झाले नव्हते तेव्हा विराट फलंदाजीमध्ये खूपच आक्रमक होता. एका मुलीचा वडील बनला नव्हता, तेव्हा प्रत्येक बॉलची संधी साधण्यासाठी मैदानावर विराट सज्ज असायचा. तु तुझे वय विसर आणि हेदेखील विसर की तु आत्तापर्यंत काय काय केलसं. असा सल्ला वॉनने यावेळी विराटला दिला आहे.

मागील काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. जवळपास त्याला गेले तीन वर्ष कोणत्याची फॉर्मेटमध्ये शतक ठोकता आलेले नाही. तसेच, सध्या सुरु असलेल्या आयपीएल (IPL 2022) च्या १५ व्या सीझनमध्येती तो फ्लॉप ठरला आहे. आत्तापर्यंत त्याने १२ सामान्यांमध्ये १९.६३ सरासरीने केवळ २१६ रन केल्या आहेत.

विराटच्या या निराशजनक कामगिरीबद्दब वॉन पुढे म्हणाला, जर विराट ३५ धावा करत असेल तर मोठा डाव खेळू शकतो. तो सध्या ० ते १० धावांमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. तो यासर्वातून बाहेर पडला, त्याने पुन्हा कौशल्य दाखवले तर तो पुन्हा सर्वश्रेष्ठ बनू शकतो. असे मत वॉनने यावेळी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!