Share

जाणून घ्या चेन्नईने कोणाला केले कायम आणि कोणाला दिला धक्का

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव पार पडणार आहे. पण त्याआधी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांचे खेळाडू मुक्त करण्याची तसेच खेळाडूंचे दुसऱ्या संघांशी ट्रेडिंग करण्याची मुदत होती.

त्यानुसार सर्व संघांनी त्यांच्या मुक्त केलेल्या खेळाडूंची तसेच संघात कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. सर्व ८संघांचे मिळून १२७ क्रिकेटपटूंना त्यांच्या संघांनी संघात कायम केले आहे. यामध्ये ३५ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.

शुक्रवारी प्रत्येक संघमालकांनी आपल्या संघातील काही खेळाडूंना करारमुक्त केलं. चेन्नईने डेव्हिड विली, सॅम बिलिंग्ज, मोहीत शर्मा, ध्रुव शौरी आणि चैतन्य बिश्नोई यांना अलविदा केलं. धोनीच्या निवृत्तीबद्दल देखील बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या मात्र चेन्नईने धोनीला कायम ठेवल्याने धोनी यंदाची आयपीएल खेळणार हे स्पष्ट झाले आहे. आपण पाहूया कोण आहेत लिलिवा आधी संघात कायम केलेले खेळाडू

1. चेन्नई सुपर किंग्स :

मुक्त केलेले खेळाडू :
सॅम बिलिंग्स, डेव्हिड विली, मोहित शर्मा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई.

संघात कायम केलेले खेळाडू :

एमएस धोनी, सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायुडू, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिशेल सँटेनर, मोनू कुमार, एन जगदीसन, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर , दीपक चाहर, केएम आसिफ.

लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम –१४.६० कोटी

https://twitter.com/Maha_Desha/status/1195665236126121985?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195664291833139201?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!