नवी दिल्ली : कालपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, कोरोना महामारीचे संकट रोखण्यात आलेले अपयश, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकरीविरोधी कायदे या मुद्दय़ांवर विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे मोदी सरकारसमोर हे अधिवेशन विना अडथळा पार पाडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
अशातच पेगासास प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून दुसऱ्या दिवशी देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालं. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना देखील अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवेसेनेने केली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘आम्ही फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशीची लेखी मागणी लोकसभा अध्यक्षांना करणार आहोत. काल संबंधित मंत्र्यांनी खुलासा केला असला तरी तो योग्य नव्हता.’ यासोबतच, आज लोकसभेत इंधन दरवाढ आणि वाढती महागाई यावर प्राधान्याने चर्चा व्हावी ही मागणी शिवसेनेनं केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस अय्यरची आणखी एका स्पर्धेतुन माघार
- काय घडलं त्या रात्री?; मिका सिंगच्या मदतीला धावले मुंबईकर
- आठ दशकानंतर मल्लखांब ऑलिम्पिकमध्ये परतणार…
- सोलापूरच्या पाणी प्रश्नात मुख्यमंत्री ठाकरे करणार मध्यस्थी; दिला ‘हा’ शब्द
- ‘वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण’; आषाढी एकादशीनिमित्त मोदींच खास ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

