Share

देशात तब्बल ६.६ कोटी लहान मुलांकडून इंटरनेटचा वापर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:-आपल्या लहानपणी मैदानी खेळांना जितके महत्व होते ते कधीच भविष्यात पाहायला मिळणार नाही असे दिसून येत आहे. कारण जगात चीननंतर इंटरनेट वापराबाबत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यापेक्षा धक्कादायक बाब अशी की, यात लहान मुलांचा इंटरनेट वापराचे प्रमाण तब्बल ६.६ कोटी इतके आहे. याबाबत अधिकृत आकडेवारी इंटरनेट अॅंड मोबाईल असोसिअशन ऑफ इंडियाने आपल्या अहवालातून दिली आहे.

सध्या देशात ३६ टक्के इंटरनेटची उपलब्धता आहे. यात देशातील एकूण ४५.१ कोटी ग्राहकांमध्ये ३८.५ कोटी युजर्स हे १२ वर्षाहून लहान वयाचे आहेत. देशात ५ ते ११ वर्षापर्यंतच्या इंटरनेट युजर्सची संख्या ६.६ कोटी इतकी आहे. याचाच अर्थ असा की, देशात इंटरनेट लहान मुले सर्वाधिक इंटरनेटचा वापर करतात आणि त्यांना कुटुंबातील सदस्याकडूनच इंटरनेट डिव्हाईस मिळते असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार, ग्रामीण भागापेक्षा शहरी युजर्स सर्वाधिक आहेत. शहरातील तब्बल १९.२ कोटी लहान मुले इंटनेटचा वापर करत आहेत. तर ग्रामीण भागात इंटरनेटसेवा कमी प्रमाणात असल्याने तेथे इंटरनेट युजर्सचे प्रमाणही कमी आहे. शहरातील १० पैकी ९ युजर्स दिवसातून किमान एकदा तरी इंटरनेट वापरतात. त्यात १६ ते २९ वयोगटातील युजर्सचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच इंटरनेट युजर्स मध्ये महिलांचा तुलनेत पुरुष अधिक प्रमाणत इंटरनेट वापरतात. देशात २५.८ कोटी पुरुष इंटरनेट वापरतात. तसेच देशभरात केरळ, तामिळनाडू, आणि दिल्लीमध्ये महिला युजर्सची संख्या जास्त आहे. असे या अहवालातून स्पष्ट होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1177927238664146945?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177933815626420225?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!