Share

तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे निर्देश; खडसे सपत्नीक आज ईडी कार्यालयात राहणार हजर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि याप्रकरणातील नाव असलेल्या त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आज ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याची मा़हिती मिळत आहे. पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टानं  मोठा दिलासा दिला होता. 17 ऑक्टोबर ते 7 डिसेंबरपर्यंत तपासयंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देत याकाळात आटवड्यातून दोनदा, दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे मंदाकिनी खडसेंना निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यानच्या काळात मंदाकिनी खडसे यांना अटक झाल्यास त्यांची 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी दिले होते.  भोसरी जमीन घोटाळ्यातील खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्यानं पीएमएलए कोर्टाकडनं मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे, ज्याविरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यावेळी तपास यंत्रणाना सहकार्य करण्याच्या अटीवरच मंदाकिनी खडसे यांना जामीन देण्यात आला होता.

दरम्यान, याप्रकरणी मंदाकिनी खडसे यांचा याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत सोमवारी पीएमएलए कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केला. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी तीन आठवड्यांची स्थगिती खडसेंच्यावतीनं मागण्यात आली. मात्र, कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली होती. एकनाथ खडसेंना मात्र याप्रकरणी कोर्टानं वैद्यकीय कारणास्तव तूर्तास दिलासा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!