Share

“कंत्राटी कामगारांना ओळखपत्र त्वरित द्या” पुणे महानगरपालिका कामगार युनियनची मागणी!

Published On: 

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यात सात हजार कंत्राटी कामगार गेली १० ते १२ वर्षापासून काम करत आहे. कंत्राटी कामगारांना टेंडरच्या अटीशर्तीला अनुसरून त्यांना सफाईचे अवजारे व गणवेश, ओळखपत्र, वेतन चिठ्ठी, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय व आपघाती विम्याची रक्कम भरावी असे असतानाही संबंधीत ठेकेदार कोणत्याही प्रकारचे संरक्षक साधने दिली जात नाही. रविवार दि. २२/३/२०२० रोजी येरवडा क्षेत्रिय कार्यालयाकडे अत्यावश्यक सेवेत कचरा वाहतूक विभागात काम करणारा कंत्राटी सेवक प्रतिक केगळे यांना सकाळी कामावर जात असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेल्या जनता करफ्यू मध्ये पोलिसांनी बेदम मारहाण केली. अंगावर खाकी गणवेश होता पण त्याच्या जवळ ओळखपत्र नव्हते म्हणून पोलिसांनी काठीने बेदम मारहाण केली.

आपत्कालीन परिस्थितीत कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यासंबधी संबंधीत ठेकेदारांना प्रशासनाने भाग पाडावे अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे. कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रश्नांच्यासंदर्भात लेखी निवेदनाद्वारे मागणी करून देखील संबंधित ठेकेदार व प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप युनियनच्या जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांनी केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तेही अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी कामगारांना ओळखपत्र नाही या कारणावरून पोलिसांनी मारहाण करावी ही प्रशासनाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे.

संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मानवाला ग्रासून मृत्यूने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कंत्राटी पद्धतीने सफाई करणाऱ्या कामगारांच्या जीवावर सामाजिक व प्रशासकीय यंत्रणा जीवावर उठत असेल तर युनियन म्हणून कदापीही अन्याय सहन करणार नाही. पोलीस यंत्रणेला सुध्दा पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे नम्र आवाहन आहे कि, संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कंत्राटी कामगारांना मारहाण करू नये. तसेच सर्व खात्यातील कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यात यावे असे आवाहन पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!