औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर तसेच जिल्हा हे अनेक काळापासून पाण्याच्या टंचाईचा सामना करत आले आहे. जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरुनही नियोजन नसल्यामुळे पाणी असुनही टंचाईचा सामना करावा लागतो. यावर मोठ्या कालावधीसाठी उपाय योजनेच्या दृष्टीकोनातुन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठाड्यात विशेष करुन औरंगाबादमध्ये नदीजोड प्रकल्प राबवावा असा प्रस्ताव समोर आणला आहे. या प्रस्तावाला आता जिल्ह्यातील लोकप्रतीनिधीचा पाठिंबा मिळत आहे.
शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता कार्यालय हे नाशिकवरुन औरंगाबाद येथे आणावे यासाठी मागणी केली. . या विभागासाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय, मुख्य अभियंतापदाची निर्मिती १९ सप्टेंबर २०१९ ला जीआरनुसार झाली असुन नाशिकला ११ डिसेंबर २०२० ला कार्यालय सुरु झाले आहे. आता खासदार डॉ. भागवत कराड यांनी या प्रस्तावाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की , मराठवाडा विकास मंडळाचा अध्यक्ष असताना हे कार्यालय औरंगाबादमध्ये असावे, अशी मागणी केली होती. आता तीच मागणी पुन्हा करू.
नाशिकला कार्यालय झाले तर दुष्काळी भागात पाणी आणणे, त्याच्या अंमलबजावणीला अडचण होईल, असे जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी सांगीतले. आमदार सतीश चव्हाण यांनी आपण जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मुख्यमंत्री यांना या संदर्भात पत्र लिहिणार आहोत असा सांगितले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दमणगंगा पिंजाळ, नार-पार, गिरणा, गोदावरी, दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाद्वारे मराठवाडा व गिरणा उपखोऱ्यासाठी कोकणातील नद्यांचे १६८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- “पंतने आपला नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे, त्यात कोणताही बदल करु नये”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

