टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि देशात कोरोना व्हायरस महामारीशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परतू हि जबाबदारी एकट्या सरकारची नसून समाज म्हणून सगळ्यांची आहे. याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधांच्या आवाहनाला समाजाच्या सर्व घटकांमधून पाठींबा मिळत आहे. सर्वच राजकीय पक्ष तसेच लोक प्रतिनिधींनी याला पाठींबा दिला आहे. आता हरी भक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनीही पाठींबा दिला आहे.
‘आपलं गाव, आपलं शहर, आपला देश कोरोनापासून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे आणि प्रशासनाचं काम नसून सर्वांचा लढा आहे, असं वक्तव्य हभप इंदोरीकर महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोरोना संदर्भातल्या आवाहानाला सर्वांनी सहकार्य करा, असंही इंदोरीकर महाराज यांनी सांगितलं आहे .
प्रत्येकाने आपण आपले कुटुंब कोरोना विषाणूपासून दूर ठेवा. घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, असं इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत.
मी पण घरी आहे तुम्ही पण बाहेर पडू नका, असे इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. इंदुरकर महाराज यांनी दिनांक 31 मार्चपर्यंत सर्व कीर्तनाचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. अशीही त्यांनी माहिती दिली आहे.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=vK5–X2kY2M
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

