Share

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने केलेले नियोजन हे कौतुकास्पद : WHO

Published On: 

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने योग्य वेळेत आणि कठोर केलेल्या उपाययोजनांचे जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी कौतुक केले. देशभरातील लॉकडाउन तीन मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हे कौतुकाचे बोल उद्गारले आहे.

‘आकड्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर खूप घाईचे ठरेल. पण कोरोनाशी लढा देण्यासाठी सहा आठवड्यांचा देशव्यापी लॉकडाऊन ही मोठी बाब आहे. सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवताना अत्यावश्यक सर्वसुविधांची उपलब्धता, खबरदारीचे सर्व उपाय, कोरोनाग्रस्तांची स्वतंत्र व्यवस्था आणि विलगीकरण कक्ष यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात भारताला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसते आहे.

अनेक आव्हाने आणि संकटांना तोंड देत भारत चांगल्या पद्धतीने कोरोनाच्या आपतीशी लढा देत आहे,’ अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी भारताचे कौतुक केले आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सगळे प्रयत्न करायला हवेत, असेही त्या म्हणाल्या.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत ३३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर करोनाबाधितांचा आकडा हा दहा हजारपेक्षा अधिक आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!