Share

मुख्यमंत्री आणि पोलीस यांच्यातील बैठक संपली , मुंबईत हाय अलर्ट जारी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून जैश ए मोहम्मदला चांगलाच धडा शिकवला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या बैठकीत मुंबई हाय अलर्टवर असल्याचे जारी करण्यात आले आहे. नुकतीच ही बैठक संपली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन मुंबईतील सुरक्षा यंत्रणेला अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. पोलीस महासंचालकांसह अनेक पोलीस अधिकारी या बैठकीस हजर होते. प्रामुख्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह सात राज्यांत हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळेच खासकरून मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरील गस्त वाढवली आहे. याचबरोबर प्रत्येक नागरिकाने देखील सतर्क राहून आजूबाजूला काही अज्ञात वस्तू आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!