मुंबई : करोना विरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्तीचं दर्शन घडवण्यासाठी दिवे व मेणबत्ती जाळण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर देशातील विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मोदींच्या आवाहनावर जोरदार टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. ‘देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांची गरज आहे,’ असा टोला थोरात यांनी लगावला आहे.
थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं @PMOIndia हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला.@INCIndia pic.twitter.com/bqQjFn5RBC
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020
पुढे थोरात म्हणाले, ‘थाळी-टाळीनंतर आता दिवे जाळण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं मोदींनी हे प्रसिद्धीचे स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचलावीत,’ असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या भाषणानं देशवासीयांची निराशा केली आहे. आम्हाला वाटलं होतं पंतप्रधान चुली पेटवण्याचा संदेश देतील पण साहेब दिवे जाळण्याचा उपदेश देऊन गेले,’ अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

