Share

भारतीय शास्त्रज्ञ कोरोना लस शोधण्यासाठी लढतायत दिवस-रात्र, शास्त्रज्ञाने दिली विशेष माहिती

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरिक हे आज कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे आता देशात आणि जगात या महामारीवर लस शोधली जात आहे. यासाठी अनेक तज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत आपल्या प्रयत्नांची शर्त लढवत आहेत. तर आता लवकरच कोरोनाची लस येणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

सीएसआयआर डीजी शेखर मंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ची परवानगी घेऊन कुष्ठरोगाच्या उपचारातील प्रभावी लसची चाचणी सुरू केली आहे. आम्हाला अजून दोन मंजुरी मिळाल्या आहेत. अशी अपेक्षा आहे की एक किंवा दोन दिवसात ते मंजूर होईल आणि त्यानंतर आम्ही प्रयोग सुरू करू. येत्या काही आठवड्यांसाठी ही लस उपचारात किती प्रभावी आहे हे यातून समजेल

तसेच यावेळी भारतात विषाणूचे जीनोम अनुक्रमांकडे लक्ष देत आहे. या क्रमांकाद्वारे हे ज्ञात आहे की जर एखाद्यामध्ये विषाणू आला असेल तर तो कोणाद्वारे आणि कसा आला आहे. त्यांच्या मते, सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) पुणेने 25 क्रमांकाचे काम केले आहे, त्याशिवाय आणखी दोन प्रयोगशाळांनी 30 जीनोम सिक्वेन्सिंग केले आहेत. येत्या दोन आठवड्यांत ही संख्या 500 ते 1000 पर्यंत पोहोचेल.

दरम्यान जगात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक देशांचे शास्त्रज्ञ हे आज कोरोनावर लस शोधत आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावर लस शोधण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचं म्हंटल आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!