Share

आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची नरेंद्र मोदींनी केली घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. 21 दिवसांकरता हा लॉकडाऊन असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना व्हायरसबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले. तसंच, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे की, एकमेव उपाय त्यावर प्रभावी आहे. एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची सायकल तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका असं मोदींनी म्हटलं आहे.

सर्व प्रगत देशांमध्ये आव्हान वाढत चाललं आहे. त्यामुळे आपण सतर्कता बाळगायला हवी, असं ते म्हणाले.दरम्यान, संपूर्ण देशामध्ये आज रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. एकप्रकारे हा कर्फ्यूच असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं,

आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. अशी बेपर्वाई सुरू ठेवली तर मोठे संकट येईल असा इशारा मोदी यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!