नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीचा पहिला दिवस भारताच्या बाजूने गेला. टीम इंडियाने 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 272 धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) नाबाद १२२ आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ४० धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी झाली आहे. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) पहिल्या दिवशी पडलेल्या भारताच्या सर्व विकेट घेतल्या.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली. या जोडीने चांगली चांगली सुरुवात करून दिली. याचा मोठा फायदा टीम इंडियाला मिळाला आणि पहिल्या विकेटसाठी दोघांनी 244 चेंडूत 117 धावांची भागीदारी केली.
11 वर्षांनंतर भारताच्या सलामीच्या जोडीने दक्षिण आफ्रिकेत 100 हून अधिक धावा जोडल्या. यापूर्वी 2010 मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली होती. मयंक अग्रवाल 60 वर बाद झाला. मयंकचे हे कसोटीतील सहावे अर्धशतक होते. त्याने 9 चौकार मारले. मयंक अग्रवालला 40व्या षटकात लुंगी एनगिडीने एलबीडब्ल्यू आऊट केले.
एनगिडीने पुढच्याच चेंडूवर चेतेश्वर पुजाराला शून्यावर बाद करून दक्षिण आफ्रिकेला सामन्यात दमदार पुनरागमन करून दिले. पुजाराला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोल्डन डक मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 मध्ये तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. एनगीडीला हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची संधी होती, जरी तो तसे करू शकला नाही.
दोन विकेट लवकर पडल्यानंतर भारतीय संघ अडचणीत दिसला. पण विराट कोहली आणि केएल राहुलने हुशारीने फलंदाजी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 171 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. भारताची धावसंख्या १९९ धावा असताना विराट बाद झाला. त्यालाही एनगिडीने आउट केल. विराट 94 चेंडूत 34 धावा करून बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘भाजप कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस थांबवा अन्यथा..’, नारायण राणेंचा इशारा
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

