🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या युरोपमध्ये युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी आपले लष्कर युक्रेनमध्ये घुसवले. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे. व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरचे हल्ले थांबवावे याकरता जगातील अनेक बलाढ्य देश आणि विविध जागतिक संघटना प्रयत्न करत आहेत.
NATO ही अमेरिका प्रणित लष्करी संघटना आहे. युक्रेन जर NATO मध्ये सहभागी झाला तर रशियाच्या भौगोलिक सिमांपर्यंत अमेरिकेचे सैन्य येऊन ठेपेल. रशियाकडे जगाचा नाश काही मिनिटात होईल अशी घटक अण्वस्त्र असल्यामुळे कोणताच मोठा देश युक्रेनला थेट मदत करावयाला धजावत नाहीये. अगदीच रशियाबरोबर युद्ध झाल्यास NATO चे सैन्य आपल्या मदतीला येईल अश्या आत्मविश्वासात युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की वावरत होते. मात्र NATO मधील कोणताही देश युक्रेनच्या मदतीला थेट युद्धभूमीवर आल्यास जागतिक युद्धालाच आमंत्रण दिल्यासारखे होईल म्हणून NATO ने ऐनवेळी हात झटकले आहेत.
NATO आपल्या मदतीला येणार नाही हे कळून चुकल्यावर आता युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताकडे रशियाला युद्ध थांबविण्याची विनंती केली आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताला रशियाला युद्ध थांबवण्यास सांगण्याचं आवाहन केलं आहे. युक्रेनमधील दूरचित्रवाणीवर देशाला संबोधताना युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताला आवाहन केले आहे. रशिया आणि भारत हे दोन देश गेल्या अनेक वर्षांपासून उत्तम संबंध असलेले देश आहेत ; त्यामुळे भारताचे म्हणणे व्लादिमीर पुतीन नक्की ऐकतील असाही विश्वास आज युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी बोलून दाखवला.
महत्वाच्या बातम्या :
- पुणे मेट्रोचा पहिला प्रवासी होण्याचा मान मोदींना; मोबाईलवरुन काढले तिकीट
- पंतप्रधानांनी मदतीची भूमिका अशीच ठेवावी- अजित पवार
- “मोठ्या व्यक्तींकडून न शोभणारी वक्तव्य…”, अजित पवारांचा राज्यपालांना अप्रत्यक्ष टोला
- “जे मोदींना जमलं ते तुम्हाला 50 वर्षाच्या…”; भाजपचे पवारांना प्रतिउत्तर
- Russia – Ukraine War: जो बायडेन आणि वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात रशिया युद्धाबाबत महत्वाची चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
