🕒 1 min read
मुंबई : आता भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे. अशी ट्रेन अद्यापही जगात कुठेही सुरू केलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’ बनवली आहे. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या एक्स्प्रेसचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत. विशेष म्हणजे, ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’मध्ये रुग्णांचा मोफत उपचार केला जाणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचललं आहेत.
India’s only and the World’s first hospital train:
"The Lifeline Express" train is presently stationed at the Badarpur stn in Lumding Div. of NFR in Assam serving patients free of costThe train is equipped with 2 modern operation theatres,5 operating tables & other facilities. pic.twitter.com/sOUDdW5qn3
— Ministry of Railways (@RailMinIndia) January 2, 2021
ही ट्रेन एकूण ७ डब्ब्यांची आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चिकित्सकांची टीम तैनात आहे. या विशेष ट्रेनमध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये कर्करोग, मोती बिंदू अशा अनेक आजारांवर उपचार केले जातात. सर्वात प्रथम भारतानेच अशाप्रकारच्या हॉस्पीटल ट्रेनची उभारणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्रिस्बेनला जाण्याची टीम इंडियाची का इच्छा नाही ? जाणून घ्या
- “कसोटीपूर्वी भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे वाईट कृत्य”
- मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर
- गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली म्हणून कॉमेडियनला खेचले पोलीस ठाण्यात
- ‘पंतने मला मिठी मारली नाही, हे सर्व माझ्याकडून उत्साहात सांगितले गेले’; चाहत्याचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
