Share

कोविड १९ च्या रुग्णांसाठी मुंबई, पुण्यात विशेष रुग्णालयांच्या सुविधेत वाढ

Published On: 

मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, सुरवातीला कोरोनाचा प्रसार थांबविण्यावर भर देण्यात आल्यामुळे रुग्णांची संख्या कमी होती. त्यावेळी मोजक्याच प्रयोगशाळा होत्या, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांना देखील चाचणीची परवानगी देण्यात आली आहे. रुग्णांचे दोन तीन दिवसांचे निदान एकदम एकत्रितरीत्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. मात्र या रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई शहरातील महानगरपालिका रुग्णालयात आयसोलेशनसाठी केवळ 28 रुग्णशय्या होत्या त्यामध्ये आता 2100 पर्यंत वाढ केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच सध्या सेव्हन हिल रुग्णालयात १५०० खाटांची सोय फक्त कोविड १९ साठी निर्माण करण्यात आली आहे. त्याच्शिवाय याठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. तर पीपीई किट्स, एन 95 मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची तर गरज आहेच. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!