Share

धक्कादायक ! पुण्यात कोरोनाने डॉक्टरांनाचं गिळले

Published On: 

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. खुद्द कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचाचं कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता सामन्यांचे जीव वाचवणारे डॉक्टर, नर्स, आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचीही सुरक्षा धोक्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की, 59 वर्षीय डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढत होते. मात्र, अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. ते खासगी प्रॅक्टिस करत होते. कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. अशी घटना याआधी मुंबईत घडली होती.

डॉक्टर्स, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या लढ्यात दिवस रात्र मेहनत घेत आहेत. मात्र आता कोरोनाने त्यांनाच आपल्या कवेत घेतले असल्याचे दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी नर्सला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर या लढ्यात बाहेर लढणाऱ्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता पोलीस, डॉक्टर्स आणि नर्स हे देखील असुरक्षित असल्याचं दिसत आहे.

पुणेकरांनो सावधान ! कोरोना वाढतोय

राज्यातील कोरोनाचाबाधितांचा आकडा आता 41642 वर गेला आहे. तर त्यातील सर्वाधिक म्हणजे 27251 रुग्ण हे एकट्या मुंबईतून आहेत. तसेच पुण्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा 5 हजारच्या वर गेला आहे. तर शुक्रवारी एका दिवसात पुण्यात सर्वाधिक 358 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत.

पुण्यातील रुग्णांचा आकडा आता 5167 वर गेला असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात काल तब्बल 291 कोरोना रूग्णांची वाढ झाली असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना बळींची संख्या 257 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 2552 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!